Allegations Against Sandipan Bhumre : समृद्धी महामार्गातील (Samruddhi Mahamarg.) भूसंपादन प्रकरणावरून उबाठा आमदार अंबादास दानवे (UBA faction MLA Ambadas Danve)यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे (MP Sandipan Bhumre) आणि पैठणचे आमदार विलास भुमरे (Paithan MLA Vilas Bhumre) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भुमरे यांनी त्यांच्या चालकाच्या नावाने जमिनीचे बक्षीसपत्र (हिबानामा)करून कोट्यवधी रुपये कमावले,असा आरोप दानवे यांनी केला.या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे दानवे सांगितले.
५ महिनाभरापूर्वी भुमरे यांच्या चालक जावेद रसूल शेख (Javed Rasool Shaikh)यांच्या नावाने 150 कोटी रुपयांची जमीन ‘हिबानामा’ (Hibanamas) म्हणून मिळाल्याचे प्रकरण गाजले होते. हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील वारसदारांकडून रक्तसंबंध नसलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मालमत्ता देण्यात आल्याने संशय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी भुमरे यांच्यावर आरोप केला आहे.
याबाबत अंबादास दानवे म्हणाले की, समृद्धी महामार्गातील भूसंपादनातून पैसे लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. भुमरेंच्या चालकाच्या नावाने वारंवार हिबानामा केला जात आहे. हे प्रकरण गंभीर असून यामागचा आर्थिक गैरव्यवहार स्पष्ट दिसतो. याचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे सर्व पुरावे जाहीर केले जातील.हे प्रकरण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी मुंबईत जाऊन त्यांची भेट घेणार आहे . तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि संबंधित चालकाला अटक करावी अशी मागणी करणार आहे.
हे देखील वाचा –
नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा
कबुतरखाना बंदीविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा
मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या









