Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी २०१७ साली चाकण (Chakan)येथे झालेल्या रास्तारोको आंदोलन (road blockade protest)प्रकरणात खेड न्यायालयाने (Khed court)सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे ३,५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये दोन माजी खासदार, एक माजी मंत्री (former minister) आणि सात आमदारांचा समावेश होता.
राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. चाकण चौकात झालेल्या या आंदोलनात भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge), शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (MP Shivaji Adhalrao Patil)यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढत, प्राण्यांना इजा न होता शर्यती घ्याव्यात, असे निर्देश दिले होते. मात्र, या अध्यादेशाला ‘पेटा’ या प्राणीमित्र संघटनेने न्यायालयात आव्हान दिल्याने शर्यतींवर पुन्हा एकदा खीळ बसली होती.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा बैलगाडा मालक-चालक संघटनेची बैठक भाजप आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. यावेळी आमदार लांडगे यांनी सरकारविरोधात आंदोलन न करता न्यायालयात गेलेल्या प्राणीमित्र संघटनांविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या दरम्यान प्राणीमित्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण करण्यात आले आणि सुमारे तीन तास रस्ता अडवण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र, आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवूनही सबळ पुरावे आढळले नाहीत, असा निष्कर्ष काढत खेड न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिलीप मोहिते, दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिगंबर भेगडे आणि देवराम लांडे यांचा समावेश होता. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले होते. दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर आलेल्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेटा म्हणजे काय?
पेटा (People for the Ethical Treatment of Animals – PETA) ही प्राण्यांच्या हक्कांसाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील नॉर्फोक येथे आहे. जगभरात २० लाखांहून अधिक सदस्य या संस्थेशी संलग्न असल्याचा दावा करण्यात येतो. पेटा (PETA) संस्थेला मलायका अरोरा, शाहिद कपूर, महिमा चौधरी, सनी लिओनी यांसारख्या सेलिब्रिटींचा पाठिंबा आहे.
हे देखील वाचा –
१५ वर्षांपूर्वी चेक बाऊन्स ! राजपाल यादव अडचणीत; ४ वाजेपर्यंत आत्मसमर्पणाचे आदेश
सोन्याने भरलेली बॅग मिळूनही प्रामाणिकपणा कायम; सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकतेला रजनीकांत यांचा सलाम
व्यापार करारावरून संसदेत वादळ; ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप








