बीडमध्ये वाढदिवसाच्या बॅनरवर आरोपी वाल्मिक कराडचा फोटो

Banners with photos of walmik Karad appeared in Beed

बीड – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड मकोका अंतर्गत कारागृहात असला तरी बीडमध्ये त्याचा दबदबा कायम असल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे सरचिटणीस बाबासाहेब घुगे यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर फोटो लावण्यात आला होता. तो चर्चेचा विषय ठरला.

या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे ,मंत्री पंकजा मुंडे, मंत्री छगन भुजबळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचेही फोटो या बॅनवर लावण्यात आले. हे बॅनर अनधिकृतपणे लावल्याचे सांगत प्रशासनाने काही तासांत ते हटवले. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कराड हा अजित पवार गटामध्ये कोणत्याही अधिकृत पदावर नसतानाही त्याचे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर सार्वजनिक ठिकाणी झळकल्याने अजित पवार गटावर टीका होत आहे.