Home / राजकीय / Bhagirath Bhalke – भगीरथ भालके शिंदे गटाच्या वाटेवर?पंढरपूरच्या राजकारणात खळबळ

Bhagirath Bhalke – भगीरथ भालके शिंदे गटाच्या वाटेवर?पंढरपूरच्या राजकारणात खळबळ

Bhagirath Bhalke – विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन (Vitthal Cooperative Sugar Factory)आणि पंढरपुरातील काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Congress leader)हे...

By: Team Navakal
Bhagirath Bhalke
Social + WhatsApp CTA

Bhagirath Bhalke – विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन (Vitthal Cooperative Sugar Factory)आणि पंढरपुरातील काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Congress leader)हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत . भगीरथ भालके हे पत्नी प्रणिता भालके आणि १२ नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे.

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (former Health Minister Tanaji Sawant) यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टरवर भगीरथ भालके यांचा फोटो झळकल्याने या चर्चेला अधिक जोर मिळाला आहे. भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके (Pranitha Bhalke)या नुकत्याच पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde)यांनी पंढरपूरचा नगराध्यक्ष आमचाच असल्याचे वक्तव्य केले होते.

सोलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांचे मंगळवेढ्यात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबन आवताडे यांच्या कार्यालयात जाहीर स्वागत करण्यात आले होते. या वेळी त्यांची भेटही झाली होती.
त्यानंतर भालके यांची शिंदे गटाशी वाढलेली जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर शुभेच्छा देत भालके यांनी नव्या राजकीय वाटचालीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रणिता भालके यांनी माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. या घडामोडींमुळे भालके लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून भगीरथ भालके काँग्रेसमध्ये नाराज असल्याचीही चर्चा आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली होती. ऐनवेळी शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले होते.


हे देखील वाचा –

 महापौर तावडें पुन्हा वादात; गाडीवर लाल दिवा; विरोधकांचा हल्लाबोल

नवाकाळचे अचूक विश्लेषण; इराण-इस्रायल संघर्षाचा महाराष्ट्राला फटका; LPG-इंडक्शननंतर पीएनजीवरही येणार ताण? पुढचे संकट पाईप गॅसचे?

१३ वर्षे कोमात असलेल्या हरीश राणा एम्समध्ये दाखल ; इच्छामृत्यू प्रक्रियेची सुरुवात ; व्हिडिओ व्हायरल

Web Title:
संबंधित बातम्या