Bihar Assembly Elections : बिहार (Bihar)विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वेबसाईटवर तांत्रिक बिघाड (Technical glitch)झाल्याने आज सकाळी मोठा गोंधळ निर्माण झाला. वेबसाईटवरील डेटा फीडमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे आघाडीवर असलेले उमेदवार पराभूत झाल्याचे दाखवण्यात येत होते.
या तांत्रिक दोषामुळे आयोगाच्या वेबसाईटवर विसंगती (errors)आढळली. पुष्पम प्रिया चौधरी यांच्या प्लुरल्स पार्टीच्या सत्य प्रकाश नावाच्या उमेदवाराला आघाडीवर दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सत्य प्रकाशला तेव्हा फक्त १४ मते मिळाली होती.
तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे (RJD candidate) उमेदवार दिपू सिंग यांना २ हजार ९६० मते मिळाली असताना त्यांना पिछाडीवर दाखवण्यात आले होते. जदयूचे आघाडीवर असलेले उमेदवार मनोरंजन सिंह (JDU candidate Manoranjan Singh) यांना ३ हजार १७५ मते मिळूनही त्यांना पराभूत दाखवण्यात आले. तर जवाहर प्रसाद (Jawahar Prasad)आणि अभिजीत अभिज्ञान यांना अनुक्रमे ४५ आणि ३८ मते मिळूनही ते आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले होते.वेबसाईटवरील हा तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर आयोगाने नंतर या चुका सुधारल्या. त्यानंतर सुधारणा करून वेबसाईटवर मतमोजणीचे आकडे अचूकपणे दाखवण्यात आले.
हे देखील वाचा –
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कामिनी कोशल यांचे निधन
यंदा मुंबईत महापौर शिवसेनेचाच; मातोश्रीबाहेर शिंदे गटाचे बॅनर









