भाजपाचा बापच मुंबई तोडणार ! संजय राऊत यांचा पलटवार

MP Sanjay Raut


मुंबई – कोणाच्या बापाचा बाप (father or grandfather)जरी आला तरी मुंबई ( separate Mumbai)महाराष्ट्रापासून वेगळी करू शकणार नाही,अशा आशयाचे भाष्य काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत (Assembly)केले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज त्याच विधानावरून फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपाचा बापच मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार,असा पलटवार राऊत यांनी केला.
फडणवीस कितीही वल्गना करत असले तरी महाराष्ट्र त्यांचा हा नाटकीपणा ओळखतो.इथे नाटकाची , रंगमंचाची थोर परंपरा आहे.त्यामुळे फडणवीसांनी असली नाटकी विधाने करू नयेत. ते ज्या पक्षाची पालखी वाहात आहेत तो पक्षच मुळी शेटजी-भटजींचा आहे.मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची हे कारस्थान भाजपाचे (Bharatiya Janata Party)शेटजी कित्येक वर्षांपासून करत आहेत.त्यामुळे कोणाचा नव्हे तर भाजपाचा हा बापच मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे,असे राऊत म्हणाले.
भाजपा खासदार निशिकांत दुबे (MP Nishikant Dubey)यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की (Sanjay Raut said), दुबे मराठी माणसांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल गरळ ओकत असताना भाजपाच्या एकाही नेत्याने त्याला खडे बोल सुनावले नाहीत. फडणवीसांचे शेंदाड शिपायी केवळ नाराजी व्यक्त करून शेपूट घालून बसले आहेत.