सिंधू करार स्थगित करणे महत्त्वाचे ! जयशंकर यांची राज्यसभेत माहिती

Minister S. Jaishankar


नवी दिल्ली – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (terrorist attack in Pahalgam) केंद्र सरकारने तातडीने अनेक पावले उचलली. त्यात सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar)यांनी सांगितले. राज्यसभेत (Rajya Sabha)आज ऑपरेशन सिंधूर वरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी काँग्रेस पक्षावरही जोरदार निशाणा साधला.


एस. जयशंकर म्हणाले की, सिंधू करार हा वेगळाच करार होता. मी जगात कुठेही असे पाहिले नाही की एखाद्या देशाच्या नद्यांचे पाणी दुसऱ्या देशात कोणत्याही अधिकाराशिवाय वाहू दिले जाते. तत्कालिन पंतप्रधानांना आपल्या देशातील राज्यांपेक्षा शेजारील पाकिस्तानच्या हिताचे अधिक महत्त्व होते. त्यांनी त्यावेळी संसदेतही पाकिस्तानच्या हिताचे भाषण केले होते. आमच्या सरकारने मात्र दहशतवादी हल्ला झाल्याबरोबर तातडीने पावले उचलली. पाकिस्तानी राजदूतांना, पाकिस्तानी नागरिकांना माघारी धाडण्यात आले. विरोधी पक्ष चीन व पाकिस्तानच्या मैत्री (China-Pakistan ties)बद्दल बोलतात. मात्र हे संबंध २००५ मध्ये झालेल्या एका करारानुसारच अधिक दृढ झाले. चीनने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच नेपाळला पहिल्यांदा शस्त्रे पुरवली होती. ९ मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स (U.S. Vice President JD Vance)यांनी पंतप्रधानांना फोन करुन पाकिस्तान मोठा हल्ला करणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हा पंतप्रधानांनी याचे योग्य उत्तर दिले जाईल असे म्हटले होते. याचा पुनरुच्चारही आज जयशंकर यांनी केला. काँग्रेसच्या सरकारने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काहीच केले नाही. मात्र आमच्या सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने पाकिस्तानवर हल्ले केले.


JP Nadda’s Attack on Congress – जेपी नड्डांचा हल्लाबोल
राज्यसभेतील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री जेपी नड्डा (Union Minister JP Nadda)यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे स्वतःच गुन्हेगार आहेत ते आज न्यायाधीश होऊन आमच्याकडेच उत्तर मागत आहेत. १९४७ नंतर (Since 1947,)मोदीच असे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी सांगितले की आम्ही कोणालाही सोडणार नाही. या आधी कधीही कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला (terrorist attacks)देशाने प्रत्युत्तर दिले नव्हते. २०१४ पासून देशातील अंधःकार दूर होऊ लागला. देशाच्या सर्व भागातील दहशतवादी कारवाया बंद झाल्या. सेना तीच आहे. मात्र आताच्या सरकारची इच्छाशक्ती जबरदस्त आहे.


समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan’s Criticism on government) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, सरकारने पर्यटकांच्या संरक्षणाबाबत झालेल्या चुकीची जबाबदारी घेतली पाहिजे. हे लोक सरकारच्या विश्वासावर तिथे गेले होते. त्यामुळे त्यांचा बळी गेला. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी नाव न घेता पंतप्रधानांच्या कालच्या लोकसभेतील भाषणाचाही समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, ज्यांच्या बोलण्यात व कृतीत काही आक्रमकपणा नसतो त्यांना देहबोली आक्रमक ठेवावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट नाव घेण्याचे टाळल्याबद्दल काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांच्यावर टीका केली.

Share:

More Posts