Ganesh Naik : आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation elections)पार्श्वभूमीवर भाजपने रणशिंग फुंकले असून वनमंत्री भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या (Ravan) अहंकाराचे दहन करावेच लागेल असे वक्तव्य त्यांनी केले.
भाजपाच्या (BJP)ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आज गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला वरिष्ठ पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते. यापूर्वीच नाईक यांनी जनता दरबारच्या माध्यमातून शिंदे गटाला (Shinde faction) थेट आव्हान दिले.
गणेश नाईक म्हणाले की, नवी मुंबई (Navi Mumbai)महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागेल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का ? पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि त्या चर्चेत तुमचा सन्मान राखला गेला नाही, तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन.
हे देखील वाचा –
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण
राजस्थान रॉयल्सच्या सीईओंचाही राजीनामा
चाकाखाली लिंबू चिरडणे पडले महागात; Mahindra Thar थेट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली