गृहमंत्री शहा -उपमुख्यमंत्री शिंदेच्या विरोधात पोस्ट मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा

amit shah and eknath shinde

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Eknath Shinde)यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी कल्याणमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी रोहन पवार (Rohan Pawar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन पवार यांनी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये (WhatsApp group) एकनाथ शिंदे आणि अमित शाह (Union Home Minister Amit Shah.)यांचे व्यंगचित्र पोस्ट केले. या पोस्टमध्ये अमित शाह खुर्चीवर बसलेले तर एकनाथ शिंदे त्यांच्याजवळ पायाशी बसलेले (shown sitting near his feet) असल्याचे दाखवण्यात आले होते.

याच ग्रुपमधील एका शिवसैनिकाने याला तीव्र विरोध करत रोहन पवार यांना फोन करून पोस्ट डिलिट करण्यास सांगितले. मात्र पवार यांनी नकार दिल्याचे सांगितले जात आहे. यानंतर रवी पाटील आणि अरविंद मोरे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या पोस्टमुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुण्यात ‘जय गुजरात’चा नारा दिल्यानंतर रोहन पवार यांनी हा वादग्रस्त फोटो शेअर केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.