आमदार संजय गायकवाडांवर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल

MLA Sanjay Gaikwad


मुंबई – आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याने कॅन्टीनच्या व्यवस्थापकाला मारहाण (assaulted)करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)आणि अन्य एका व्यक्तीविरुध्द मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station)अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल (social media) होऊन ४८ तास उलटून गेले तरी गायकवाड यांच्या गुन्हा दाखल न झाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यानुसार शक्य असेल ती कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
तत्पुर्वी आज सकाळी माध्यमांशी बोलताना आमदार गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. मी जे केले ते चांगल्यासाठी केले. कोणी काहीही म्हणो, मला त्याची पर्वा नाही (I don’t care),असे म्हणत गायकवाड यांनी सत्तेमुळे आलेल्या मग्रुरीचे दर्शन घडवले होते.
गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये घातलेल्या राड्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सरकारवर आणि मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. गायकवाड यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही,असा सवाल फडणवीस यांना विचारला जात आहे. त्यावर गुन्हा दाखल करावा की करू नये याचा निर्णय आपण पोलिसांवर सोपविला आहे,असे उत्तर फडणवीस यांनी आज दिले.
फडणवीस यांच्या या भूमिकेबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्दामपणाचे उत्तर दिले. मी जे काही केले ते चांगल्यासाठी केले. त्या एका दिवसात राज्यातील सर्व सरकारी उपहार गृहांमध्ये साफसफाई करण्यात आली. माझ्यामुळे अनेकांचा जीव वाचला,असा दावा गायकवाड यांनी केला.
या मारहाणीबद्दल तुमच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही,असा प्रश्न विचारला असता, गुन्हा दाखल होण्याचा प्रश्नच येत नाही. पोलीस त्या कॅन्टीनवाल्याकडे गेले होते. त्याने तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. कारण हा गुन्हा मुळात अदखलपात्र आहे. तो दाखल झाला तरी मला त्याची फिकीर नाही,असे गायकवाड म्हणाले होते.