Chandrashekhar Bawankule : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार (Candidates)ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नागपुरात महसूलमंत्री ( Revenue Minister) आणि भाजपाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर भेटीसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्यातील ९ नगरपालिका, २ नगरपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. आजपासून अर्ज (Nominations) भरण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे इच्छुकांच्या नेत्यांच्या घरासमोर रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भाजपाने अजून आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. महायुतीत लढायचे की स्वबळ (Independently) आजमवायचे याबद्दलही गोंधळ आहे.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, ७-८ वर्षाने निवडणूक होत असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे. अनेक कार्यकर्त्यांचा स्वबळावर लढण्याचा आग्रह आहे. महायुती होणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील. दरम्यान, गेल्यावेळी जिल्ह्यात काँग्रेसने (Congress)भाजपाला धक्का देत मोठे यश मिळवले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचा गृहजिल्हा असल्याने नागपुरमध्ये भाजपाला (BJP) यश मिळवून देण्याचे आव्हान भाजपासमोर आले.
हे देखील वाचा –
ट्रम्प यांची ‘लाडकी बहीण’ योजना! अमेरिकेतील नागरिकांना देणार 2,000 डॉलर
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये संघ गीत गाण्यावरून वाद ! चौकशीचे आदेश
सिंचन घोटाळ्याचे आरोपही खोटे ठरले ! आताही बिनबुडाचे आरोप! अजित पवार बिनधास्त









