Home / राजकीय / Chhagan Bhujbal : जरांगेंमध्ये सुसंस्कृतपणा नाही; मंत्री छगन भुजबळांची टीका

Chhagan Bhujbal : जरांगेंमध्ये सुसंस्कृतपणा नाही; मंत्री छगन भुजबळांची टीका

Chhagan Bhujbal – मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी काल मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj...

By: Team Navakal
Chhagan Bhujbal Criticized Manoj Jarange Patil

Chhagan Bhujbal – मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी काल मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये पंधरा मिनिट चर्चा झाली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत मला काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांच्यात सुसंस्कृतपणा (lacks decency)नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे पाटील कुणालाही काहीही बोलतो. सुसंस्कृतपणा त्यांच्यात नाही. हा माणूस कधी मुख्यमंत्री (Chief Minister), कधी उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलतो. काल राहुल गांधींच्याही नावाचा उल्लेख झाला. त्यांच्या हातात काही राज्ये आहेत, ते नेते आहेत.राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)घराण्याने काहीतरी त्याग केलेला आहे. फडणवीस कार्यतत्पर आणि हुशार (Intelligent leader)आहेत. चांगल्या रितीने राज्य चालवत आहेत.असंस्कृत माणूस काहीही बोलतो आणि मराठा समाजाचे नेते ही त्याच्या पाठीमागे जातात.मराठा समाज हा आमचा शत्रू नाही. आम्ही एकही शब्द मराठा समाजाबद्दल बोललो नाही. पण हा जो नेता उगवला आहे तो सातत्याने आमच्यावर टीका करत आहे. तो आम्हाला काही बोलला नसता तर आम्ही त्यांच्या वाटेला गेलो नसतो.


हे देखील वाचा –

फडणवीस आणि राज उद्या एकाच मंचावर; ट्रेलर लॉंचिंगला एकत्र हजेरी..

क्रिकेटर रिंकू सिंगला तीनदा धमकी ! दाऊद गँगने 5 कोटी खंडणी मागितली

मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना जागा मिळावी म्हणून समिती स्थापन

Web Title:
संबंधित बातम्या