Home / राजकीय / Congress : मनसेवरून काँग्रेस-उबाठा भिडले ; पवार आठवडाभराने निर्णय घेणार:

Congress : मनसेवरून काँग्रेस-उबाठा भिडले ; पवार आठवडाभराने निर्णय घेणार:

Congress : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला सोबत घेतल्यानेच महाविकास आघाडीत फूट पडल्याचे काँग्रेसने (Congress)...

By: Team Navakal
Congress & UBT
Social + WhatsApp CTA

Congress : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला सोबत घेतल्यानेच महाविकास आघाडीत फूट पडल्याचे काँग्रेसने (Congress) स्पष्ट केले. मुंबई पालिकेत स्वबळाचा नारा दिलेल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Congress president Varsha Gaikwad)यांनी आज सकाळीच पक्षाच्या शिष्टमंडळासोबत मविआ नेते शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी दडपशाही करणारे किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, अशी टीका मनसेवर करत मविआ फुटीचे कारण सांगितले.

काँग्रेसच्या या आरोपांवर उबाठा नेते विनायक राऊत (UBT leader Vinayak Raut) यांनी पलटवार केला. काँग्रेसची संपूर्ण देशात दयनीय अवस्था होत चालली आहे. ती पाहिल्यानंतरही त्यांना स्वबळावर निवडणूक (Elections) लढवण्याची इच्छा असेल, तर त्यांना कोणीही रोखणार नाही, असा टोला लगावला. दुसरीकडे शरद पवार हे काँग्रेससोबत जायचे की काही वेगळा प्रयोग करायचा, याबद्दल आठवडाभरात निर्णय घेणार आहेत.

खासदार वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस आमदार अमीन पटेल, आमदार अस्लम शेख यांच्यासह सकाळी सिल्व्हर ओकवर (Silver Oak)जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेससोबत (शरद पवार गट) काँग्रेसची अनेक वर्षांपासून नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे आणि ती पुढेही कायम राहावी अशी काँग्रेसची मनापासून इच्छा आहे. यावर शरद पवारांनी पुढील आठवड्यात काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

मनसेच्या मविआतील सहभागाबद्दल बोलताना वर्षा गायकवाड यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. त्या म्हणाल्या की, दडपशाही करणारे किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष संविधान, लोकशाही, समता, बंधुता आणि न्यायावर विश्वास ठेवतो आणि मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे. मुंबईची निवडणूक प्रांत, धर्म, भाषा किंवा जात या वादात न पडता, मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर व्हायला हवी. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी, प्रदूषण आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा समावेश असावा. दुसरीकडे गायकवाड यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, याबद्दल काँग्रेस पक्षासोबत चर्चा व्हायला पाहिजे होती, अशी खंतही व्यक्त केली. दरम्यान, गायकवाड यांनी संजय राऊत यांच्या पालिका निवडणुकीत मविआची गरज नाही, या दोन महिन्यांपूर्वीच्या भूमिकेकडे लक्ष वेधले.

निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, निकालानंतरचे निर्णय निकालानंतर घेतले जातील. सध्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर रिपब्लिकन घटक यासारख्या समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे.

यावर उबाठा नेते विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या इच्छेवर टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी स्वबळ लढावे. आमच्याच बरोबर या, असा आमचा हट्ट राहणार नाही. पण काँग्रेसने स्वतःच्या पक्षाची दयनीय अवस्था रोखण्यासाठी जी जबरदस्त ताकद आणि इच्छाशक्ती लागते, ती त्यांच्याकडे आहे की नाही, याचा विचार करावा. याबद्दल आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्यवेळी भूमिका स्पष्ट करतील.

आजच्या भेटीबद्दल शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सांगितले की, भेटीत काय चर्चा झाली याबद्दल मला कल्पना नाही, पण निश्चितच पवारांनी काँग्रेसला काहीतरी मोलाचा सल्ला दिला असणार. आता काँग्रेसने तो ऐकायचा की नाही हे त्यांनी ठरवले पाहिजे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सर्वसामान्य मराठी माणसांच्या खूप अपेक्षा आहेत. मुंबई महापालिका ४६ हजार कोटींची असल्याने सगळेच जण ती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील.


हे देखील वाचा – 

नागपूरात दाट वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याला पकडण्यासाठी पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन

 मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या

१० वर्षांहून जुन्या वाहनांनाही फिटनेस टेस्ट द्यावी लागणार!

Web Title:
संबंधित बातम्या