Congress Leader Shivraj Patil : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar)यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.लातूर येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काँग्रेसचे अभ्यासू नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण राज्यमंत्री,वाणिज्य,विज्ञान-तंत्रज्ञान,अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा विविध विभागाचे काम पाहिले.
१९९० ते १९९६ या कालावधीत ते लोकसभेचे अध्यक्ष होते.विधीज्ञ म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणारे शिवराज पाटील- चाकूरकर लातूर नगर पालिकेतील निवडणुकीपासून राजकारणात शिरले १९८० ते १९९९ असा त्यांचा दिल्लीतील राजकारणाचा प्रवास राहिला.२००४ मध्ये ते देशाचे गृहमंत्री होते आणि मुंबईवरील २००८च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, २०१० ते २०१५ दरम्यान पंजाबचे राज्यपाल (Governor of Punjab)आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.खास व नीटनेटक्या पेहरावामुळेही त्याकाळात चाकूरकर यांची चर्चा होत असे.त्यांच्या पश्चात मुले,मुली,सून नातवंडे असा परिवार आहे.
चाकूरकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी,मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला असून लोकसभेतही शोक प्रस्ताव मांडण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
हे देखील वाचा –
महाराष्ट्र शासनाच्या 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; पाहा संपूर्ण लिस्ट
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी; रिफंडही मिळणार, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश








