Home / राजकीय / Dispute In Mahayuti :पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत वाद

Dispute In Mahayuti :पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत वाद

Dispute In Mahayuti – पुढील वर्षी निवडणूक होणाऱ्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या (Pune Graduates Constituency) जागेवरून महायुतीतले (Mahayuti alliance)...

By: Team Navakal
Dispute In Mahayuti
Social + WhatsApp CTA

Dispute In Mahayuti – पुढील वर्षी निवडणूक होणाऱ्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या (Pune Graduates Constituency) जागेवरून महायुतीतले (Mahayuti alliance) मतभेद उफाळून वर आले आहेत. भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच पक्षात आलेल्या शरद लाड यांना संभाव्य उमेदवार असे संबोधत उमेदवारी घोषित केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

सांगलीच्या पलूस (Palus) येथे भाजपा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी शरद लाड यांच्या उमेदवारीबद्दल थेट भाष्य केले. ते म्हणाले की, मी ताकाला जाऊन भांडे लपवणारा नाही. शरद लाड पदवीधरसाठी मतदार नोंदणी करत आहेत. कारण ते भाजपाचे (BJP)या मतदारसंघाचे पुढचे उमेदवार आहेत. त्यांची अधिकृत घोषणा दिल्लीतून होईल. मात्री मी त्यांचे नाव आताच सांगून टाकतो. दरम्यान, शरद लाड हे शरद पवारांच्या गोटात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड (NCP MLA Arun Lad) यांचे चिरंजीव आहेत. पदवीधरची तयारी करणाऱ्या शरद लाड यांनी गेल्या महिन्यातच भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण आमदार लाड हे अजूनही शरद पवारांसोबतच आहेत.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif)म्हणाले की, निवडणुकीला दीड वर्षे अवधी असताना चंद्रकांत पाटील उमेदवारीबाबत चर्चा करत आहेत, हे समजत नाही. तसेच विद्यमान आमदार लाड यांनी गेल्यावेळी भैय्या माने यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना शरद लाड (Sharad Lad)कसे पराभूत होतील हे पटवून देऊ.


हे देखील वाचा –

३ नोव्हेंबरला राज्यातील वकीलांचे एक दिवस कामबंद आंदोलन

तटकरेंचा शेवटचा हिशोब चुकता करणार! आमदार दळवींचा इशारा

मुंबईत कबुतरखान्यांसाठी चार नव्या जागांचा विचार

Web Title:
संबंधित बातम्या