Home / राजकीय / Karnataka CM: तुम्हाला कन्नड येते का? राष्ट्रपतींना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विचारणा

Karnataka CM: तुम्हाला कन्नड येते का? राष्ट्रपतींना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विचारणा

Karnataka CM

Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी भर कार्यक्रमातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu)यांना तुम्हाला कन्नड (Kannada)भाषा येते का, असा प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना विचारलेल्या या प्रश्नाने कार्यक्रमस्थळी एकच हास्यकल्लोळ झाला. राष्ट्रपतींनीही सिद्धरामय्या यांना उत्तर दिले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी कर्नाटकच्या म्हैसूर (Mysuru) भागाच्या दौऱ्यावर होत्या. ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (India Institute of Speech and Hearing)संस्थेच्या ६० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. यावेळी मंचावरून भाषण करताना सिद्धरामय्या हे अचानक थांबले आणि त्यांनी सहजच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘तुम्हाला कन्नड येते का?’ असा प्रश्न केला. त्यांच्या या प्रश्नाला नंतर राष्ट्रपतींनीही उत्तर दिले.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, की कन्नड ही माझी मातृभाषा (Mother tongue) नाही. पण मी आपल्या देशातल्या सर्व भाषांचा, संस्कृतींचा आणि परंपरांचा सन्मान करते. प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेचं, परंपरांचं, संस्कृतीचं जतन व संवर्धन करावं. माझ्या त्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा आहेत. मी हळूहळू कन्नड भाषा शिकण्याचा प्रयत्न करेन.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेबाबत आग्रही भूमिका मांडली होती. “जो कुणी कर्नाटकमध्ये राहात आहे, त्याला कन्नड भाषा बोलता आली पाहिजे. आपण सर्वजण कन्नड (Kannadigas)आहोत”, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर तेव्हा विरोधकांकडून आक्षेपही घेण्यात आला होता.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


मॅरेथॉन स्पर्धेच्या बॅनरवरून वाद ; काँग्रेस जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा

मुंबईच्या गणेशोत्सवावर १७ वर्षांत पालिकेचे २४७ कोटी रुपये खर्च

केसीआर यांच्या कन्या के. कविता बीआरएस पक्षातून निलंबीत