बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख(Santosh Deshmukh)हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे (Parli MLA Dhananjay Munde.)यांच्यावर सातत्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत .यावरुन कराडचा निकटवर्ती गोट्या गित्तेने (Gotya Gitte) आव्हाड यांना व्हिडिओ जारी करून धमकी दिली.
गोत्या गित्तेने धमकी देत म्हटले की, जितेंद्र आव्हाड तुमचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत. तुम्ही वंजारी समाजाचे नाही आहात. जर तुम्ही पुन्हा वाल्मिक कराड बद्दल काही बोललात तर ते महागात पडेल. मी लहान माणूस आहे. मला फाशी झाली तरी चालेल, पण माझ्या दैवताला काही बोलू नका. तुम्ही धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहात. परळीतील कुणालाही विचारा अण्णा (Anna)म्हणजे कोण ते सर्व सांगतील. मी आत्महत्या केली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.
या धमकीवर आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad h)म्हणाले की, गोट्या गित्ते हा अट्टल गुन्हेगार (habitual crimina) आहे. त्याचे बंदूक दाखवत असल्याचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. अशा गुन्हेगारांच्या धमक्यांना मी घाबरत नाही. त्याने याआधीही माझ्याबद्दल अर्वाच्च भाषा (abusive language) वापरली होती.यांना एवढा माज कुठून येतो ? मी वंजारी आहे की नाही याचे प्रमाणपत्र मला त्याच्याकडून घ्यायचे नाही. मी खानदानी वंजारी आहे.