Honey Trap: राजकीय वर्तुळातून दर दिवसाला काही काही ना काही खुलासे समोर येतच असतात. अशीच एक खुलासा करणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap)अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून (Blackmail) खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका अज्ञात महिलेने आमदाराकडे ही खंडणीची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तिन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी आमदाराकडे केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील यांनी थेट चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
नेमका प्रकार काय?
त्यांनी सांगितल्या प्रमाणे ही अज्ञात महिला त्यांना गेल्या वर्षभरापासून विविध मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत होती. महिलेने सुरुवातीला त्यांच्याशी संदेशाद्वारे संवाद देखील साधला आणि त्यानंतर फोन करून मैत्री करण्याची इच्छा असल्याचे देखील सांगितले. संवाद वाढीनंतर तिने काही तरुणींचे अश्लील छायाचित्रे (Obscene photos) आमदारांना पाठवायला सुरुवात केली. यानंतर तिने धमक्या द्यायला देखील सुरवात केली. मैत्री आणि अश्लील छायाचित्रांच्या साहाय्याने या अज्ञात महिलेने आमदाराकडे खंडणीची मागणी करण्यास सुरुवात केली. तिने कधी एक लाख, कधी दोन लाख, तर कधी पाच लाख रुपये अशा वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली गेली. पाटील याना जेव्हा या महिलेचा त्रास असह्य झाला तेव्हा त्यांनी तिचा संपर्क ‘ब्लॉक’ केला, तेव्हा तिने उलट त्यांनाच पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली होती. या सगळ्या प्रकारानंतर आमदार शिवाजी पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.
हे देखील वाचा –
Cough Syrup: तुम्हीसुद्धा सर्दी-खोकल्यावर कफ सिरप घेता का? त्यापेक्षा करा हे घरघुती उपाय