Home / राजकीय / आमदार निवासात कॅन्टीन सुरु करण्यास परवानगी कशी? अमोल मिटकरींचा सवाल

आमदार निवासात कॅन्टीन सुरु करण्यास परवानगी कशी? अमोल मिटकरींचा सवाल

मुंबई – मुंबईतील आकाशवाणी आमदार (canteen at Akashvani MLA Hostel) निवास येथील कॅन्टीन आज पुन्हा सुरु झाले आहे. या कॅन्टीन...

By: Team Navakal
Akashwani MLA Hostel Uphargruha

मुंबई – मुंबईतील आकाशवाणी आमदार (canteen at Akashvani MLA Hostel) निवास येथील कॅन्टीन आज पुन्हा सुरु झाले आहे. या कॅन्टीन मध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे अशी तक्रार करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर स्वच्छतेचा अभाव आढळून आल्यामुळे केटरर्सचा परवाना (license)रद्द केला. त्यानंतर आता हे कॅंटीन पुन्हा सुरू झाले आहे. पण आमदार निवासात कँटीन (canteen) पुन्हा सुरु करण्यास परवानगी कशी मिळाली ? असा सवाल अजित पवार गटाचेच आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari)यांनी केला .
हा परवाना रद्द झाल्यानंतर केटरर्सला विधिमंडळाकडून परवानगी मिळाल्याची माहिती आहे . या संदर्भात व्यवस्थापकांनी सांगितले की, आम्हाला परवानगी मिळाल्याने आम्ही सकाळपासून कॅन्टीन पुन्हा सुरू केले आहे. पण ही परवानगी इतक्या तातडीने कशी मिळाली? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, कॅन्टीनची अवस्था पाहिली तर त्याला परत परवानगी दिलीच कशी हा मोठा प्रश्न आहे. जर मराठी माणसाला किंवा बचत गटाला कॅंटीन चालवायला दिले असते, तरी चालले असते.

Web Title:
संबंधित बातम्या