रत्नागिरी – लवकरच महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi government) येणार आहे. त्यात मी मंत्री असणार आहे. पण त्याआधी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता (Leader of the Opposition) होणार आहे,असा ठाम विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav)यांनी येथे व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर (Vice President Mahesh Natekar)आणि सदस्य नेत्रा ठाकूर (Netra Thakur) यांनी साथ सोडल्यानंतर, आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली वेळणेश्वर येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात, भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना जाधव अश्रूंनी भावुक झाले.तर येणाऱ्या काळात संपूर्ण शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येणार असा विश्वास यावेळी भास्कर जाधवांनी व्यक्त केला.
भास्कर जाधव म्हणाले की, २००९ ते २०१४ मध्ये मी मंत्री असताना रामदास कदम यांनी एकदा माझे पाय धरले होते. कदम हा वाघ नाही तर बिबट्या आहे. रामदास कदम (Ramdas Kadam)यांना मी सांगतो, मी कोणाच्या सावलीला सुद्धा घाबरत नाही.माझ्या नशिबात जे असेल तेच मला मिळणार आहे. मी कोणालाही विरोध केलेला नाही, आणि करणारही नाही. तू माझ्या पाय पडलास (touched my feet)आणि माझ्या योगेशला तुझ्या पदरात टाकतो बोललास. मी कधीच तुझ्या पाया पडलो नाही.लाज वाटली पाहिजे तुम्हाला ३० वर्षे बार पत्नीच्या नावावर होता. भडवेगिरीचे पैसे कमावले . तुम्ही गृहराज्यमंत्री असताना आणि आता तुमचा मुलगा गृहराज्यमंत्री असताना बार बंद करावा असे कधी वाटले नाही.