Home / राजकीय / Dcm Ajit Pawar : मंत्र्यांनो जमत नसेल तर खुर्च्या खाली करा! अजित पवारांचा दम

Dcm Ajit Pawar : मंत्र्यांनो जमत नसेल तर खुर्च्या खाली करा! अजित पवारांचा दम

Dcm Ajit Pawar – काम जमत नसेल, पक्षाला वेळ देता येत नसेल, तर खुर्च्या (Chairs) रिकाम्या करा, अशा कडक शब्दांत...

By: Team Navakal
Dcm Ajit Pawar

Dcm Ajit Pawar – काम जमत नसेल, पक्षाला वेळ देता येत नसेल, तर खुर्च्या (Chairs) रिकाम्या करा, अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP President) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला. ते आज नागपूर (Nagpur)येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकदिवसीय चिंतन शिबिराच्या उद्घाटनावेळी बोलत होते. त्यामुळे मंत्र्यांना डच्चू, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Elections) पार्श्वभूमीवर पक्षाचे आगामी ध्येय-धोरण निश्चित करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पक्षाला वेळ न देणाऱ्या, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा दुसरी कामे अधिक महत्त्वाची असतील तर तुम्ही पदे रिकामी करा. 

पालकमंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांना संबंधित जिल्ह्यांचे वेळोवेळी दौरे करावे लागतील. केवळ 25 जानेवारी, 15 ऑगस्ट,1मेला झेंडावंदन करण्यासाठी पालकमंत्रिपद नाही. पालकमंत्र्यांनी वेळोवेळी जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले पाहिजे. दौऱ्यात पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही सोबत घ्यावे. हे जमत नसेल तर खुर्च्या रिकाम्या करा.

पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल ते पुढे म्हणाले, आजचा नागरिक आपल्याकडून प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची अपेक्षा करतो.त्यासाठी आपण आगामी वर्षभर राष्ट्रवादी जनसंवाद अभियान (Rashtravadi Jansamvad Abhiyan)सुरू ठेवणार आहोत. सरकार आणि पक्ष यांमध्ये अधिक चांगला समन्वय ठेवण्याचा प्रयत्न आपण करू. इतिहास फक्त पुस्तकात लिहिला जात नाही, तर अशा बैठकांमधून घडतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे चर्चा केली पाहिजे. भाजपा-शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याबद्दलही अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले. हे सत्ता किंवा पदासाठी उचललेले पाऊल नव्हते. महाराष्ट्राचे स्थैर्य, प्रगती आणि ठोस निर्णय घेण्याची गरज म्हणून आम्ही महायुतीत गेलो, असा खुलासा पवारांनी केला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी मराठा-ओबीसी वादावरही (Maratha–OBC reservation issue)भाष्य केले. स्वतःची सामाजिक ओळख सांगताना ते म्हणाले, मी मराठा समाजात जन्माला आलेला एक कार्यकर्ता आहे. असे असले तरी ओबीसी, दलित, मुस्लीम, ख्रिश्चन अशा समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीची जबाबदारी ही माझी आहे. हे समजून आपणही काम करावे. आपला पक्ष एखाद्या जातीपातीचा, गोत्याचा, धर्माचा नाही. तळागाळातील नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. दरम्यान, मराठा समाजाला कुणबीतून (Kunbi category) ओबीसी आरक्षण देण्यावरून ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय कोंडी झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ओबीसीबहुल नागपुरात अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

नागपूर येथील एकदिवसीय चिंतन शिबिरात वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भविष्यातली दिशा, पक्ष विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरण तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी बूथरचना यासारख्या विषयांवर उहापोह केला जाणार आहे. दिवसभरातील चर्चेतून तयार होणारा आराखडा नागपूर डिक्लरेशन म्हणून प्रसिद्ध केला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

पर्यटन म्हणून विदर्भ दौरा नको-पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही मंत्र्यांचे कान टोचले. ते म्हणाले, मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये. इथे यायचे असेल तर योग्य रितीने आपल्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, अशा पद्धतीने या. नाही तर दोन तासांचे पर्यटक म्हणून यायचे आणि मुंबईत जाऊन अजितदादा आणि तटकरे साहेबांसमोर येतात. मी या जिल्ह्यात जाऊन आलो, हे करून आलो, याला काही अर्थ नाही. दरम्यान, विदर्भात राष्ट्रवादीकडे भंडारा-गोंदिया, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.


हे देखील वाचा 

आज India vs Pakistan महामुकाबला; ‘सुपर 4’ मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने, जाणून घ्या मॅच कधी आणि कुठे पाहता येणार?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू; कोडपासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंत जाणून घ्या महत्त्वाची माहिती

मतचोरीकडे लक्ष द्या! तयारीला लागा उद्धव व राज ठाकरेंचे एकनाथ शिंदे लक्ष्य

Web Title:
संबंधित बातम्या