Jaykumar Gore Criticism – सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण (Political) चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) पाच सदस्यांनी भाजप (BJP) उमेदवाराला मतदान (Voting) केल्याने भाजपला सत्ता मिळाली.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर जोरदार टीका केली.
“लोकशाहीचा खून” (Democracy Murder) – गोरेंचा आरोप
जयकुमार गोरे म्हणाले, “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात आहे.”
पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप (Serious Allegations)
गोरे पुढे म्हणाले की, पालकमंत्री विनाकारण आकांडतांडव (Aggressive Behavior) करत आहेत. “पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे, पोलिसांना त्रास देणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. चौकात पोलिस दिसला नाही तर सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जातात,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “साक्षात पोलिस अधीक्षकांशी (Superintendent of Police) बोलतानाही ते घरगड्यासारखी वागणूक देतात, हे निंदनीय आहे.”
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह (Election Process Questioned)
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप (Interference) केल्याचा आरोप करत गोरे म्हणाले, या निवडणुकीत त्यांना आत जाण्याची काय गरज होती? जिल्हा परिषद इतिहासात (History) अशा प्रकारे बैठक कधीच झाली नव्हती.”
तसेच, “307 सारख्या गंभीर गुन्ह्यांतील (Serious Offences) आरोपी सदस्यांना स्वतः हात धरून आत नेणे, ही लोकशाही आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सदस्यांवर दबावाचा आरोप (Pressure Politics)
गोरे यांनी आरोप केला की, “ज्या सदस्यांवर विश्वास नव्हता, त्यांना 45 दिवस डांबून ठेवले (Detention) आणि नंतर जबरदस्तीने मतदानासाठी आणले. गाडीतून उतरवून हात धरून नेणे, हा लोकशाहीचा अपमान आहे.










