Home / राजकीय / Allegation On Pratap Sarnaik : २०० कोटींची जमीन लाटली ! सरनाईकांनी आरोप फेटाळला

Allegation On Pratap Sarnaik : २०० कोटींची जमीन लाटली ! सरनाईकांनी आरोप फेटाळला

Allegation On Pratap Sarnaik : महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी पक्षांमधील नेते जमीन व्यवहारांमुळे वादात सापडत आहेत. आधी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ...

By: Team Navakal
Allegation On Pratap Sarnaik
Social + WhatsApp CTA

Allegation On Pratap Sarnaik : महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी पक्षांमधील नेते जमीन व्यवहारांमुळे वादात सापडत आहेत. आधी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Union Minister Murlidhar Mohol)नंतर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरदेखील जमीन लाटल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. प्रताप सरनाईकांनी (Transport Minister Pratap Sarnaik)२०० कोटींची जमीन फक्त ३ कोटीमध्ये हडपल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Congress leader Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. तर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या वडेट्टीवारांनी पुरावे देऊन बोलावे, असे म्हणत सरनाईकांनी आरोप फेटाळला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केला की, मंत्री सरनाईकांनी स्वतः च्या शिक्षण संस्थेसाठी (Educational institution)मोक्याच्या ठिकाणी ४०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ४ एकर जमीन फक्त ३ कोटीत खरेदी केली आहे.मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशाप्रकारे जमीन घेता येते का? तुम्ही महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो.

या आरोपांवर प्रताप सरनाईक म्हणाले की, मी कुठे आणि कशी जमीन घेतली आहे, हे तपासण्यासाठी मी सकाळीच येथे आलो आहे. नेमकी ही जमीन कोणती आहे, हे मलाच माहिती नाही. जमीन २०० कोटींची आहे आणि ती ३ कोटीत मिळाली असेल तर ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. मी राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे इतके गंभीर आरोप झाल्यानंतर जनतेला स्पष्टीकरण देणे माझे काम आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. त्यामुळे पुरावे देणे हे त्यांचे काम आहे. त्यानंतर मी यावर खुलासा करेन.

यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, विजय वडेट्टीवार हे फक्त मीडियामध्ये बोलतात, त्यांनी माझ्याकडे तक्रार करावी. तक्रार दिली तर चौकशी होईल.


हे देखील वाचा –

वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण! मोदींनी गायला वगळलेला भाग

वंदे भारत ‘कडून रेल्वेच्याभावी पिढीची पायाभरणी ; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

सँडहर्स्ट रोड रेल्वे अपघात; कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

Web Title:
संबंधित बातम्या