मुंबई– राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरण (three-language policy)आणि पर्यायाने हिंदी (Hindi)भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर तब्बल १९ वर्षांनी एकत्र आले होते. ठाकरे बंधू या मेळाव्यात एकत्र येताच सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंवर टीका (criticizing) सुरु केली आहे. ठाकरे बंधू हे स्वार्थासाठी आणि फक्त निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत, अशा प्रकारची टीकात्मक वक्तव्य महायुतीच्या नेत्यांकडून केली जात आहेत.
मात्र महायुतीच्या या वक्तव्यांना मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) आणि उबाठा पक्षाने खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राज-उद्धव ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांचा रांगेत बसलेला एक फोटो शेअर करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी, काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण, शिवसेना आणि काँग्रेस असा प्रवास केलेले नारायण राणे, भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे. हा फोटो पोस्ट करत राज-उद्धव यांच्या फोटोवर हे सत्तेसाठी, तर मग हे…??? असा परखड सवाल उबाठा आणि संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.