Home / राजकीय / MNS Vice President Resigns : मनसे विद्यार्थी सेनेत अंतर्गत नाराजी? भोसले यांची एक्झिट ; संयम की विचारबदल?

MNS Vice President Resigns : मनसे विद्यार्थी सेनेत अंतर्गत नाराजी? भोसले यांची एक्झिट ; संयम की विचारबदल?

MNS Vice President Resigns – (Maharashtra Navnirman Sena) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष निलेश भोसले (Vice President Nilesh Bhosale) यांनी...

By: Team Navakal
MNS Vice President Resigns
Social + WhatsApp CTA

MNS Vice President Resigns – (Maharashtra Navnirman Sena) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष निलेश भोसले (Vice President Nilesh Bhosale) यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. राजीनाम्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष Raj Thackeray, शर्मिला ठाकरे आणि Amit Thackeray यांच्यासोबतचे ३० हून अधिक जुने फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

https://www.facebook.com/share/p/1arLsvZzCT


जून २०२४ मध्ये राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अमित ठाकरे यांनी निलेश भोसले यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्षपदी (Vice President of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena)नियुक्ती केली होती. विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक कामात ते सक्रिय होते.


राजीनाम्याच्या एक दिवस आधी भोसले यांनी सोशल मीडियावर “लवकरच नव्या भूमिकेत आणि नव्या विचारांसहित… नवी दिशा, नवे धोरण, नवा संकल्प… आपली साथ आणि आशीर्वाद नेहमीच सोबत राहो,” असा संदेश देत भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले होते.


राजीनामा जाहीर करताना त्यांनी लिहिले, “आज मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्ष पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. धन्यवाद. आपले प्रेम व स्नेह असेच माझ्यासोबत कायम राहो. राजकारणात संयम असावा लागतो; पण तो संयम जर आपल्या अस्तित्वाचीच परीक्षा घेणारा असेल, तर संयम ठेवावा की विचार बदलावा, हा प्रश्न आहे.”


भोसले यांच्या या भूमिकेमुळे मनसेत अंतर्गत नाराजी आहे का, अशी चर्चा सुरू झाली असून ते कोणती नवी राजकीय दिशा स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे देखील वाचा –

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लक्ष्मीनारायण मंदिराला पाडकामाची नोटीस; मंदिर स्थलांतराचा मुद्दा तापला

 डोंबिवलीत पहाटे ४.१५ वाजता बेसमेंटमध्ये आग; २९ दुचाकी जळून खाक ; ५ जखमी

३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

रिलायन्स रुग्णालयात तेजस ठाकरे यांच्यावर उपचार : उद्धव-रश्मी ठाकरे रुग्णालयात

Web Title:
संबंधित बातम्या