MVA Meeting – महाराष्ट्रातील आगामी महापालिका (Municipal)आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (local body elections)पार्श्वभूमीवर मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत मनसेबाबत (MNS) अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
शरद पवार (Sharad Pawar)म्हणाले की, मनसेला आगामी निवडणुकीत सोबत घ्यावे की नाही याचा निर्णय बैठकीत होईल, मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. मी काँग्रेसचे कोणते निर्णय घेत नाही. परंतु उद्याच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो. मनसेबाबत मविआ एकत्र बसून निर्णय घेईल. आमच्या पक्षाचे निर्णय सर्वांना विचारात घेऊनच होतात.
काल टिळक भवन (Tilak Bhavan)येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मनसेसोबत कोणत्याही प्रकारची युती करू नये, असा पदाधिकाऱ्यांचा एकमताचा सूर होता. मनसेसोबत युती केल्यास काँग्रेसच्या (Congress) विचारसरणीला धक्का बसेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या मविआ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती किंवा आघाडी करायची की नाही, याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या संसदीय मंडळाची (Congress Parliamentary Board)बैठक बुधवारी होणार आहे.
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)यांनी उद्या ११ वाजता आपल्या निवासस्थानी ‘शिवतिर्थ’वर बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना मुंबईतील शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे.
हे देखील वाचा –
२०० कोटींची जमीन लाटली ! सरनाईकांनी आरोप फेटाळला
वंदे भारत ‘कडून रेल्वेच्याभावी पिढीची पायाभरणी ; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार









