Home / राजकीय / Mumbai Mayor Ritu Tawde : महापौर तावडें पुन्हा वादात; गाडीवर लाल दिवा; विरोधकांचा हल्लाबोल

Mumbai Mayor Ritu Tawde : महापौर तावडें पुन्हा वादात; गाडीवर लाल दिवा; विरोधकांचा हल्लाबोल

Mumbai Mayor Ritu Tawde – मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या नव्या गाडीवर लावलेल्या लाल दिव्यामुळे राजकीय वर्तुळात वाद...

By: Team Navakal
Mumbai Mayor Ritu Tawde
Social + WhatsApp CTA

Mumbai Mayor Ritu Tawde – मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या नव्या गाडीवर लावलेल्या लाल दिव्यामुळे राजकीय वर्तुळात वाद (controversy ) निर्माण झाला आहे. लाल दिवा वापरण्यास परवानगी नसतानाही गाडीवर लाल दिवा लावण्यात आल्याचा आरोप होत असून, विरोधकांनी यावर तीव्र टीका केली आहे.या प्रकरणावर आमदार मिलिंद नारेवकर यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत टीका केली. तसेच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही रितू तावडे यांच्यावर निशाणा साधला.

Ritu Tawde BMC Mayor
Ritu Tawde BMC Mayor

केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातलेली असतानाही महापौरांच्या वाहनावर लाल दिवा लावण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. वाहनाच्या छतावर नसला तरी पुढील बाजूस लाल आणि निळे दिवे बसवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांच्या ताफ्यात पोलिसांच्या वाहनासारखी लाल-निळ्या दिव्यांची स्कॉर्पिओ गाडी असल्याचीही चर्चा आहे.मुंबई महापालिकेवर दीर्घकाळ सत्ता असलेल्या उबाठाची सत्ता संपल्यानंतर भाजपाची सत्ता आली. पण सत्ता आल्यानंतर महापालिकेत पुन्हा व्हीआयपी संस्कृती (VIP culture ) वाढत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

महापौरांच्या गाडीवर लाल दिवा लावल्याचा आरोप होताच हा मुद्दा social media वरही चर्चेत आला. एका X (Twitter) page वरून महापौरांच्या कारचा फोटो शेअर करण्यात आला. त्या फोटोमध्ये गाडीच्या front grill जवळ लाल आणि निळे flash lights लावलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला.या पोस्टमध्ये “मुंबईच्या महापौरांच्या वाहनाला पोलिसांसारखे red-blue lights वापरण्याचा परवाना आहे का?” असा सवालही विचारण्यात आला आहे. या पोस्टवर विविध mixed reactions उमटत असून अनेकांनी शहरात पुन्हा VIP culture वाढत असल्याची टीका केली आहे.

नियमात काय म्हटले आहे ?

भारत सरकारने १ मे २०१७ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार (Gazette Notification)सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा ( red beacon), नावफलक ( name pla), ध्वज (flag ) किंवा अधिकार दर्शवणारी कोणतीही चिन्हे लावण्यास बंदी आहे. केवळ अग्निशमन सेवा, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत लाल, निळा, पांढरा किंवा इतर रंगांचे दिवे (multi-colour lights)वापरण्याची परवानगी आहे. अधिकृत कामावर नसताना अशा रंगीत दिव्यांचा वापर करणे बेकायदेशीर मानले जाते. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाऊ शकते.

आमदार मिलिंद नार्वेकर एक्स पोस्ट

उबाठा गटाचे आमदार Milind Narvekar यांनीही या मुद्द्यावर X post करत टीका केली. नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

किशोरी पेडणेकर यांचा घणाघात

किशोरी पेडणेकर (UBT Kishori Pednekar)म्हणाल्या की, २०१७ मध्ये यावर मोठी चर्चा झाली होती आणि त्यानंतर अशा वाहनांवर लाल-निळे दिवे लावू नयेत असा नियम करण्यात आला. मी महापौर असताना कुटुंबासाठी असलेली गाडीही नाकारली होती आणि ते मानधन मुंबईकरांसाठी दिले. प्रोटोकॉलची माहिती घेऊनच निर्णय घेतला पाहिजे होता. मी महापौर असताना कधीही मुंबईच्या बाहेर गाडी नेली नव्हती.मी महापौर झाल्यानंतर फक्त एकदाच माझ्या कुलदैवतेला गाडी घेऊन गेली होती ती माझी भावना होती.मी कधीही लाल दिव्याचा मोह केला नाही महापौरांनाही तो टाळता आला असता.

रितू तावडे यांचे स्पष्टीकरण

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना महापौर रितू तावडे यांनी गाडीवर लावण्यात आलेल्या दिव्यांबाबत आपल्याला पूर्वकल्पना नसल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, संबंधित दिवे पालिकेतील अधिकाऱ्यांनी बसवले होते आणि त्याबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. गाडीवर लाल दिवा लावण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी झालेली चूक मान्य केल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी महापौरांचा बचाव करत परिस्थिती स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या संदर्भातील माहिती त्यांनी घेतली आहे. गाडीच्या छतावर पारंपरिक पद्धतीचा लाल दिवा लावलेला नव्हता, मात्र गाडीच्या बोनेटजवळ लाल रंगाचा दिवा बसवण्यात आला होता. या बाबतीत महापौरांचा कोणताही थेट दोष नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात कोणीही लाल दिवा वापरू नये हा नियम आधीपासूनच लागू आहे आणि तो सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे महापौरांनाही त्या नियमाची पूर्ण कल्पना आहे. या घटनेच्या आधारावर महापौरांना विनाकारण लक्ष्य केले जात असल्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे मुद्दाम लक्ष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

सततच्या घड्याळामुळे रितू तावडे चर्चेत

मुंबईच्या महापौर रितू तावडे या यापूर्वीही एका वेगळ्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या हातातील घड्याळाच्या किंमतीबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. काही नेटकऱ्यांनी तावडे यांच्या हातात दिसणारे घड्याळ हे ‘रोलेक्स डेटोना’ (Rolex Daytona)कंपनीचे असून त्याची किंमत तब्बल ६० ते ७० लाख रुपये असल्याचा दावा केला होता. काहींनी तर भारतात या घड्याळाची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचेही म्हटले होते. या दाव्यांमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

मात्र या चर्चेला उत्तर देताना रितू तावडे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले होते. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या हातातील घड्याळ ‘रोलेक्स डेटोना’चे नसून ‘मायकल कोर्स’ ( Michael Kors)कंपनीचे आहे. त्यामुळे त्याची किंमत लाखो किंवा कोट्यवधी रुपये असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले होते.

तसेच सोशल मीडियावर त्यांच्या घड्याळाबाबत करण्यात येणारे दावे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. काहीजण अफवा पसरवून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा निराधार आरोपांकडे आपण लक्ष देत नसल्याचेही स्पष्ट केले होते.


हे देखील वाचा –

नवाकाळचे अचूक विश्लेषण; इराण-इस्रायल संघर्षाचा महाराष्ट्राला फटका; LPG-इंडक्शननंतर पीएनजीवरही येणार ताण? पुढचे संकट पाईप गॅसचे?

 उन्हाळा सुरू! थंड हवेच्या ठिकाणांचा शोध घेताय? भारतातील या 5 सर्वोत्तम हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या

 इलेक्ट्रिक बाइक घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ कंपनीकडून २५ हजारांपर्यंतची मोठी सवलत

Web Title:
संबंधित बातम्या