GST Tax : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Congress president Mallikarjun Kharge)यांनी नव्या जीएसटी रचनेला तीव्र विरोध केला आहे जीएसटीचा मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेवर मोठा भार पडतो आहे. पण याउलट धनदांडग्यांचा जीएसटी संकलनामध्ये केवळ ३ टक्केच वाटा आहे. जीएसटीचे दोन स्लॅब करून मोदी सरकार एक राष्ट्र, एक कर या मूळ भूमिकेपासून दूर जात आहे. गेल्या एक दशकापासून काँग्रेस पक्ष जीएसटीमध्ये सुलभीकरणाची मागणी करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
खरगे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये (Post on X)सध्याच्या जीएसटीचा ‘गब्बर सिंग टॅक्स’ (Gabbar Singh Tax)असा उल्लेख केला. गेल्या काही वर्षांत कर संकलनात झालेली लक्षणीय वाढ ही कमी उत्पन्न गटांवर भार टाकणारी आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्येच मोदी सरकारने लागू केली नवी कररचना म्हणजे ‘गब्बर सिंग टॅक्स आहे, अशी टीका केली होती.
लगभग एक दशक से, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, GST के सरलीकरण की माँग कर रही है।
— Mallikarjun Kharge (@kharge) September 4, 2025
मोदी सरकार ने “One Nation, One Tax” को "One Nation, 9 Taxes" बना दिया था।
जिसमें 0%, 5%, 12%, 18%, 28% के Tax Slabs शामिल थे और 0.25%, 1.5%, 3% व 6% की विशेष दरें थीं।
कांग्रेस पार्टी ने अपने…
ते म्हणाले, एकूण जीएसटीच्या दोन तृतियांश म्हणजेच ६४ टक्के रक्कम गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशातून येते. पण अब्जाधीशांकडून फक्त ३ टक्के जीएसटी वसूल केला जातो. कॉर्पोरेट कराचा दर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षांत आयकर संकलनात २४० टक्के वाढ झाली आहे आणि जीएसटी संकलनात १७७ टक्के वाढ झाली आहे.
जीएसटीमधील सुधारणांचा राज्यांच्या महसुलावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन सर्व राज्यांना पाच वर्षांसाठी भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, सर्व राज्यांना २०२४-२५ हे आधार वर्ष धरून पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी भरपाई देण्यात यावी. कारण दरांमध्ये कपात केल्याने राज्यांच्या महसुलावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (Former Union Finance Minister P. Chidambaram)यांनीही सरकारच्या मूळ जीएसटी रचनेपासून यू-टर्न घेण्यावर भाष्य केले. कर सुसूत्रीकरणाचे कौतुक केले. पण हे पाऊल आठ वर्षे उशिराने उचलण्यात आल्याचा टोला सरकारला लगावला.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
जीएसटीचे 2 स्लॅब रद्द! कोणत्या वस्तू स्वस्त-कोणत्या वस्तू महाग झाल्या, पाहा संपूर्ण यादी
चंद्रपुरात गणेशोत्सव मंडपावरून मुनगंटीवार-जोरगेवार आमनेसामने
मालमत्ता जप्तीविरोधातील मेमनच्या नातेवाईकांची याचिका फेटाळली