GST – नोएडात आज आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यासपीठावरुन विरोधी पक्षांवर टीका (criticized)केली. जीएसटीच्या नवीन दरांबद्दल काही राजकीय पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत. २०१४ पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारचे अपयश लपविण्यासाठी काँग्रेस (Congress)आणि त्यांचे मित्रपक्ष जनतेशी खोटे बोलत आहेत. सत्य हे आहे की काँग्रेसच्या राजवटीत कर लूट मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी सामान्य नागरिक करांच्या ओझ्याने दबले जात होते, अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली.
मोदी पुढे म्हणाले की २०१४ पूर्वी आम्ही सत्तेत नव्हतो, तेव्हा आयकर सवलती फक्त २ लाख रुपयांपर्यंत मर्यादित होत्या. आम्ही १२ लाख रुपयांपर्यंत आयकर सूट दिली. नवीन जीएसटी सुधारणांमुळे या वर्षी देशाचे २.५ लाख कोटी रुपये वाचणार आहेत. देश आज अभिमानाने जीएसटी बचत महोत्सव साजरा करत आहे. २०१७ मध्ये आम्ही जीएसटी लागू केला आणि अर्थव्यवस्था मजबूत केली. आता आम्ही जीएसटीचे नवे दर लागू केले आणि अर्थव्यवस्था आणखी मजबूत करू.
अर्थव्यवस्था मजबूत होत जाईल तसा कराचा भार कमी होईल. चिपपासून ते जहाजापर्यंत सर्व काही भारतातच तयार करायचे आहे. म्हणूनच तुमचे व्यवसाय मॉडेल अशा प्रकारे विकसित करा जे स्वावलंबी भारताच्या उद्देशाला बळकटी देईल. बदलत्या जगात एखादा देश जितका इतरांवर अवलंबून असेल तितकाच त्याचा विकास धोक्यात येईल. त्यामुळे भारताला कोणावरही अवलंबून राहणे परवडणारे नाही.
हे देखील वाचा –
भविष्यात मुलगी देखील राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
GST चा ग्राहकांना मोठा फायदा! 5 लोकप्रिय डिझेल SUV च्या किमतीत 1.86 लाख रुपयांपर्यंत कपात
डिकी बर्ड: पंचगिरीतील ‘लेजेन्ड’! भारतीय संघाच्या 1983 विश्वचषक विजयाचे होते साक्षीदार