Home / राजकीय / Jain Boarding Land : जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात हायकोर्टात याचिका

Jain Boarding Land : जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात हायकोर्टात याचिका

Jain Boarding Land – पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर (Seth Hirachand...

By: Team Navakal
Jain Boarding Land

Jain Boarding Land – पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर (Seth Hirachand Nemchand Jain Digambar) बोर्डिंगच्या जमिनीच्या विक्री फसवून केल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात धर्मदाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर १३ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या बोर्डिंगचे एक विश्वस्त चकोर गांधी (Chakor Gandhi)यांनी ५ ऑक्टोबरला राजीनामा दिला.

जैन समाजाकडून (Jain community) करण्यात आलेल्या आरोपानुसार, बोर्डिंगची सुमारे ३ हजार कोटींची जमीन केवळ २३० कोटी रुपयांना विकण्यात आली. या जमिनीच्या विक्रीत गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग आहे. ही कंपनी पुर्नविकासाठी खास ओळखली जाते. या कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ (Union Minister Murlidhar Mohol)यांची भागीदारी असल्याची चर्चा पुण्यात सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोहोळ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप

पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (Public charitable trust)अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जागेची काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकारण तापले असून खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अडचणीत येऊ शकतात, कारण गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला ही जमीन विकताना त्यांची भागीदारी असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने पुण्यात काळ्या फिती लावून आणि निषेधाचे फलक घेऊन जैन बोर्डिंगपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला होता.


हे देखील वाचा – 

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईकवर खास ऑफर; दिवाळीला खूपच स्वस्तात खरेदीची संधी

सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी ‘एनओसीची’ गरज नाही

भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कोणते 20 संघ खेळणार? वाचा संपूर्ण यादी

Web Title:
संबंधित बातम्या