मुंबई – विधिमंडळ परिसरात (legislature premises) काल झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज न्यू आका इन मेकिंग, (New Aka in the Making)आपण कायदा व सुव्यवस्था नसलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) राहताय अशा आशयाचे फलक झळकावले.
रोहित पवार म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेले आमदार विधानभवनात (Assembly)येतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळतो. पण सत्तेतील लोकांना कुठेही कायदा हातात घेता येऊ शकतो (law into their own hands)असे काल दाखवून दिले. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)यांच्या कार्यकर्त्यांना बाहेर थांबवले होते मात्र तरीही ते आत आले. जितेंद्र आव्हाड यांना धमकी आली. अध्यक्षांना सांगून सुद्धा असे प्रकार घडत आहेत. गांजा विकणारा माणूस घेऊन भाजपाचे आमदार विधानभवनामध्ये येतात. सांगलीमध्ये एक आका तयार झाला आहे. न्यू आका इन मेकिंगला सरकारने कंट्रोल करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मनाचे असते तर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना जाब विचारला असता. मात्र तसे झाले नाही. नितीन देशमुख यांना रात्री भेटलो. त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आज त्यांना जामीन मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.