Home / राजकीय / उत्तर प्रदेशमध्ये सपाकडून तीन आमदारांची हकालपट्टी

उत्तर प्रदेशमध्ये सपाकडून तीन आमदारांची हकालपट्टी

लखनौ – उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाने (SP) तीन आमदारांची (MLA)अचानक हकालपट्टी(Expels)केली आहे. आमदार राकेश प्रताप सिंह, मनोज कुमार पांडे आणि...

By: Team Navakal
Abhay Singh (Gosaiganj, Ayodhya), Rakesh Pratap Singh (Gauriganj, Amethi), and Manoj Kumar Pandey (Unchahar, Rae Bareli)

लखनौ – उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाने (SP) तीन आमदारांची (MLA)अचानक हकालपट्टी(Expels)केली आहे. आमदार राकेश प्रताप सिंह, मनोज कुमार पांडे आणि अभय सिंह (Abhay Singh )यांना पक्षातून काढले. अभय सिंह हे गोसाईगंजचे आहेत. तर राकेश प्रताप सिंह (Rakesh Pratap Singh)हे गौरीगंजचे (Gauriganj) आणि मनोज कुमार पांडे (Manoj Kumar Pandey)हे उंचाहरचे (Unchahar) आमदार आहेत. त्यांच्यावर केलेल्या कारवाई बाबत पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

आमदार अभय सिंह, राकेश प्रताप सिंह आणि मनोज कुमार पांडे यांना सांप्रदायिक फुटीरतावादी विचारसरणी, शेतकरीविरोधी, महिलाविरोधी, युवकविरोधी, व्यवसायविरोधी, कामगार वर्गविरोधी आणि पीडीएविरोधी विचारसरणीला पाठिंबा दिल्याने त्यांना पक्षातून काढले आहे. या लोकांना हृदयपरिवर्तनासाठी दिलेला वाढीव कालावधी आता पूर्ण झाला आहे. भविष्यातही ‘जनविरोधी’ लोकांना पक्षात स्थान दिले जाणार नाही आणि पक्षाच्या मूलभूत विचारसरणीविरुद्ध कृती नेहमीच अक्षम्य मानल्या जाती असे पक्षाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या