दुबे दुबे के मारेंगेचा टी-शर्ट घालून संदीप देशपांडेंची दुबेंवर टीका

Dube Dube Ke Marenge” T-shirt

मुंबई – हिंदी आणि मराठी भाषेवरून महाराष्ट्रात सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाही. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande)यांनी समुद्रात दुबे दुबे के मारेंगे (Dube Dube Ke Marenge)असा मजकूर असलेला टी-शर्ट घालून भाजपा खासदार निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey)यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.

हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)यांच्यावर टीका करत, राज ठाकरे जर उत्तर भारतात आले, तर पटक-पटक कर मारेंगे असे विधान केले होते. याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंनी आप मुंबई आइए (“Come to Mumbai,), समंदर में डुबे-डुबे कर मारेंगे असे उत्तर दिले होते. आता संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा आधार घेत दुबेंना पुन्हा लक्ष्य केले आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरेंनी जो इशारा दिला होता, तोच इशारा या टी-शर्टमधून दिला आहे. मराठी माणसाबद्दल, भाषेबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल ज्यांच्या मनात द्वेष आहे त्यांच्यासाठीच हा इशारा आहे. निशिकांत दुबेंचा मुंबईत फ्लॅट आहे. एकदा त्यांना इथे येऊ द्या. मग मराठी माणूस काय आहे, हे त्यांना नक्कीच कळेल. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा (Marathi language)द्वेष करणाऱ्यांना तोंड लपवावे लागेल. त्यांच्यावर सध्या तीच वेळ आली आहे.