Shaktipeeth Mahamarg Protest |शक्तीपीठ महामार्गविरोधात आंदोलन केल्याने राजू शेट्टींसह ४०० जणांवर गुन्हा

Raju Shetti to Protest Against Shaktipeeth

कोल्हापूर – महायुती (Mahayuti) सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात (Shaktipeeth Mahamarg Protest) काल राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers) केले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. आंदोलकांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली. या आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यासह ४०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरोली एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, बंदीचे आदेश असतानाही जमाव जमवून महामार्ग अडवण्यात आला. त्यामुळे राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे आणि शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आंदोलनाच्या आधीच कोल्हापूर पोलीस राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी दाखल झाले होते आणि त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तरीही बंदी आदेशांचे उल्लंघन करत आंदोलन करण्यात आले.