महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश

Dnyaneshwari Munde Protest

मुंबई – परळीतील व्यापारी महादेव मुंडे (businessman Mahadev Munde)हत्या प्रकरणात २१ महिन्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात आता विशेष तपास पथक (Special Investigation Team)स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde)यांनी कुटुंबासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. या वेळी भाजपा आमदार सुरेश (BJP MLA Suresh Dhas)धसही उपस्थित होते.

महादेव मुंडे यांची परळी तहसील कार्यालय (Parli tehsil office)परिसरात २१ महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एसआयटी व सीआयडीमार्फत करण्यात यावा, या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक वेळा उपोषण, आंदोलन केले. तसेच त्यांनी कुटुंबासह दोन वेळा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला होता. आज फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. तसेच महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल आणि फोटोदेखील दाखवले.

या भेटीनंतर सुरेश धस म्हणाले की, आयपीएस पंकज कुमावत (IPS officer Pankaj Kumavat. F)यांच्या अध्यक्षतेखाली हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. बीडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तांदळातील खड्यासारखे बाजूला काढा, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. महादेव मुंडे यांच्या घरापासून परळीच्या लोकप्रतिनिधींचे घर ५०० मीटरवर आहे. ते अजून त्यांच्या कुटुंबाला का भेटले नाहीत ? अजित पवार (Ajit Pawar)यांनी परळीत त्यांच्या विश्वासातील दोन व्यक्ती पाठवाव्यात आणि ह्या ठिकाणी काय कारभार सुरू आहे याची माहिती घ्यावी.

या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Fadnavis) यांनी आरोपीला अटक करू असे आश्वासन दिले आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही सांगितले आहे. मला अपेक्षा आहे की, आता तरी आम्हाला न्याय मिळेल.