UBT vs BJP – उबाठा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी अमित शहा (Amit Shah) यांचे नाव न घेता त्यांचा अॅनाकोंडा (Anaconda)असा उल्लेख केल्याने संतापलेल्या भाजपाने ठाकरे हे घरात बसलेले अजगर असल्याची टीका केली आहे.भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पक्ष गिळणारा अजगर असेही म्हटले आहे.
बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule)यांनी म्हटले की,इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावे. कारण ते घरात बसलेले अजगर (python) आहेत. ते फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुत्कार काढतात. या अजगराने स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकले, आपल्या सैनिकांना गिळले, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळले.
🟧 28 – 10 – 2025 | 📍मुंबई | माध्यमांशी संवाद
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 28, 2025
प्रत्येकाने प्रामाणिकपणे पक्षकार्य केले पाहिजे, हेच आदरणीय @AmitShah भाईंचे म्हणणे आहे.@BJP4India @BJP4Maharashtra @AmitShahOffice #BJP #Maharashtra #Mumbai #ChandrashekharBawankule pic.twitter.com/J5sL5OEyyy
ते पुढे म्हणाले की, ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली आहे.
हे देखील वाचा –
मुंबई मेट्रो ३ मार्गावर सामानाची ने-आण करताना प्रवाशांची दमछाक
शबरीमला चोरीचे सोने बंगळुरू येथून जप्त
सातारा आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह निंबाळकर वादाच्या भोवऱ्यात









