Tribal Corporation Election : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या (Tribal Development Corporation) संचालक पदाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. यात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal)यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे विजयी झाले. माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित (MLA J.P. Gavit’s)यांचा मुलगा इंद्रजीत गावित यांनाही यश मिळाले. शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसार हेही विजयी झाले आहेत.
संचालक पदाच्या १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात होते. १६ केंद्रांवर ९६ टक्के मतदान झाले होते. २०१० नंतर तब्बल १७ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. तत्पूर्वी, पूणे, रायगड, अहिल्यानगर गटातून आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे वैभव पिचड (BJP’s Vaibhav Pichad)आणि अमरावती गटातून भाजपा आमदार केवळराम काळे (Amravati BJP MLA Kewalaryam Kale) यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. या दोघांचीही बिनविरोध निवड झाली.
आज सकाळी ९ वाजता नाशिक येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीत मतमोजणी सुरू झाली. महामंडळाच्या या निवडणुकीसाठी राज्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी याप्रमाणे ८२४ मतदार आहेत. वेगवेगळ्या कारणाने महामंडळ संचालकांची पंचवार्षिक निवडणूक लांबली. त्यामुळे गेल्यावेळी पाच वर्षांसाठी निवडून दिलेल्या संचालकांनी तब्बल १७ वर्षे कामकाज बघितले.
आदिवासी विकास मंत्री (Tribal Development Minister) हे या महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. याच खात्याचे राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात. दोन हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल असलेल्या या महामंडळाकडून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच आदिवासी भागांसाठी काम केले जाते.
हे देखील वाचा –
सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक









