मुंबई – राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या आणि पर्यायाने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू तब्बल 19 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मात्र या एकत्र येण्यावर सत्ताधारी महायुतीकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. ठाकरे बंधू (Thackeray brothers) निवडणुकीसाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका महायुतीतील नेत्यांनी केली. महायुतीच्या या टीकेला मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि उबाठा (UBT) पक्षाने एक्स पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
त्यामध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) बसलेला फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) , भाजपा खासदार नारायण राणे (MP Narayan Rane), तसेच अजित पवार गटाचे छगन भुजबळ(Chhagan Bhujbal), प्रफुल पटेल (Chhagan Bhujbal) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा समावेश आहे. या फोटोखाली राज-उद्धव एकत्र आले तर ते सत्तेसाठी, मग हे…??? असा थेट सवाल उपस्थित करत मनसे व उबाठा पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे.