पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah)आज पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी शहरातील खडकवासला परिसरात असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण (inaugurated) केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांना नमन (respects)करतो. १७ व्या शतकात येथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने (Maratha Empir)अटकेपार झेंडे लावले होते. एनडीए हे प्रेरणास्थान असून देशाच्या सुरक्षेचे महत्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी हेच योग्य ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा थोरल्या बाजीरावांनी पुढे नेला नसता तर कदाचित भारत आपल्या मूळ स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालाच नसता.बाजीरावांच्या लढाईचे वैशिष्ट्य होते की ते स्वत:साठी कधीही लढले नाही. ते देशासाठी आणि स्वराज्यासाठी लढत होते. मी कधी निराश झालो तर माझ्या मनात बालपणीचे शिवाजी महाराज आणि थोरल्या बाजीरावांचा विचार येतो आणि नैराश्य गायब होते. जर ते एवढ्या बिकट परिस्थितीत लढले असतील तर आपण त्यांच्या तुलनेत खूप सुस्थितीत आहोत. स्वराज्यासाठी संघर्ष करण्याची गरज पडली तेव्हा केला, स्वराज्य टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपले नेतृत्व आणि सैन्य ती जबाबदारी पार पाडेल. ऑपरेशन सिंदूर त्याचे उत्तम उदाहरण आहे,असे शहा म्हणाले.
भाषणाच्या ओघात शहा यांनी एनडीएची स्थापना इंग्रजांनी केली,असा चुकीचा संदर्भ दिला. जेव्हा इंग्रजांनी या परिसरात एनडीएचा पाया रचला तेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती की हे ठिकाण भविष्यात हे भारताच्या सुरक्षेचे संस्थान बनेल,असे शहा म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. कारण एनडीएची मूळ स्थापना भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुण्याच्या खडकवासला येथे झाली हे इतिहासात नमूद आहे.
चौकट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जय गुजरात
गुजरात दौऱ्यावर शहा यांच्यासोबत उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. काँग्रेसचे नाना पटोले,शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, सुषमा अंधारे आदिंनी एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली. ठाकरे गटाने त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमावर पोस्ट केला.
