Home / राजकीय / नाशकात विलास शिंदे उबाठातून बाहेर पडले

नाशकात विलास शिंदे उबाठातून बाहेर पडले

नाशिक – सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ आता उबाठाचे (UBT)नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत....

By: Team Navakal
Nashik city chief of UBT Vilas Shind
Social + WhatsApp CTA

नाशिक – सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ आता उबाठाचे (UBT)नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विलास शिंदें (Vilas Shinde)बरोबरच उत्तर महाराष्ट्रातील उबाठाचे दोन माजी आमदार आणि आठ माजी नगरसेवकही शिंदे गटात दाखल होण्याच्या तयारीत आहेत.
उबाठातून बाहेर पडण्याबाबत बोलताना विलास शिंदे म्हणाले की, प्रत्येक वेळेस मला डावलले गेले. काही सहन करण्याची सुद्धा सीमा असते. मी कट्टर शिवसैनिक आहे. पक्षात स्थानिक नेत्यांवर माझी नाराजी आहे. मी खासदार संजय राऊत (Sanjay raut)यांच्याकडे माझ्या नाराजी व्यक्त केली होती. पण १५ दिवस उलटून गेले तरीही त्यावर काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या