Home / राजकीय / कोल्हापुरीने तोंड फोडणार! हिंदुस्थानी भाऊला धमकी

कोल्हापुरीने तोंड फोडणार! हिंदुस्थानी भाऊला धमकी

कोल्हापूर – कोल्हापुरी चप्पलने (Kolhapuri chappal.)तोंड फोडणार, अशी धमकी वजा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) कार्यकर्ते प्रशांत भिसे (Prashant Bhise)यांनी सोशल...

By: Team Navakal
Hindustani Bhau Threatened

कोल्हापूर – कोल्हापुरी चप्पलने (Kolhapuri chappal.)तोंड फोडणार, अशी धमकी वजा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) कार्यकर्ते प्रशांत भिसे (Prashant Bhise)यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला दिली आहे. महादेवी हत्तीणीच्या वादामध्ये हिंदुस्थानी भाऊने उडी घेत कोल्हापूरकारांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडीओ शेअर केला होता.

हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रशांत भिसे यांनी हिंदुस्तानी भाऊला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी आपला एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, ‘हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक (Hindustani Bhau, aka Vikas Pathak)तुला एकच गोष्ट सांगतो. तू कोल्हापूरकरांना शिव्या द्यायच्या भानगडीत पडू नको. कोल्हापूरचे प्रोडक्ट माहिती आहे का तुला? कोल्हापुरी चप्पल. या चप्पलेने तुझे तोंड फोडणार म्हणजे फोडणारच हे लक्षात ठेव. मराठी माणसाच्या (Marathi people)नादी लागू नको.

Web Title:
संबंधित बातम्या