भाजपा व आयोगाला चोरी करु देणार नाही! राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi on Maharashtra Assembly Elections


भुवनेश्वर – बिहार निवडणुकीच्या (Bihar elections)आधी मतदार याद्यांचे पुनरावलोकन सुरु आहे. या द्वारे भाजपा (BJP)महाराष्ट्राप्रमाणेच मतदारांची चोरी करण्याचा प्रयत्न करत असून आम्ही भाजपा व निवडणूक आयोगाला (Election Commission)बिहार निवडणुकीत काही गडबड करु देणार नाही असा घणाघात काँग्रेस खासदार व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी आज केला. ते भुवनेश्वर येथे संविधान बचाव कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी राहुल गांधी म्हणाले की, भाजपा देशात संविधानाबरोबर (Constitution)खेळ करत आहे. मी काल बिहार मध्ये होतो. ज्याप्रमाणे भाजपाने महाराष्ट्राच्या (Maharashtra)निवडणुकीत चोरी केली त्याचप्रमाणे इथेही हा प्रयत्न सुरु आहे. निवडणूक आयोग हा चोरीचा कट पूर्णत्वास नेत आहे. आयोग सध्या भाजपाच्या एखाद्या शाखेप्रमाणे काम करत आहे. महाराष्ट्रात नव्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. त्यावर आम्ही आयोगाकडे अनेक वेळा तक्रार केली तरी त्यांनी आम्हाला त्याचे व्हिडियो व मतदार यादी दिली नाही. मी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना आवाहन करतो की, बिहारमध्ये भाजपाला ही मतदारांची चोरी करु देण्यात येऊ नये. यावेळी त्यांनी ओडिशा राज्य सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, ओडिशा सरकार सध्या केवळ गरीब लोकांचे पैसे लुबाडत आहे. सध्या अदानी ओडिशा सरकार चालवत आहे. अदानी मोदी यांनाही चालवत आहेत. रथयात्रेत लाखो भाविक जगन्नाथाचा रथ खेचतात. तो रथ अदानींसाठी थांबवला जातो. यावरुन तुमच्या लक्षात येईल की ओडिशाचे सरकार काही धनदांडगे चालवत आहेत. त्यांना केवळ तुमची जमीन, जंगल व भविष्य चोरायचे आह