Home / राजकीय / Mallikarjun Kharge :योगी स्वतःला भावी पंतप्रधान मानतात ; खरगेंचा हल्लाबोल

Mallikarjun Kharge :योगी स्वतःला भावी पंतप्रधान मानतात ; खरगेंचा हल्लाबोल

Mallikarjun Kharge – आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Sssembly elections) पार्श्वभूमीवर तब्बल ८५ वर्षांनंतर आज बिहारच्या पटणामध्ये आयोजित काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत...

By: Team Navakal
Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge – आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Sssembly elections) पार्श्वभूमीवर तब्बल ८५ वर्षांनंतर आज बिहारच्या पटणामध्ये आयोजित काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार , भाजपा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath)यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. एनडीएमधील (NDA)फूट स्पष्ट दिसत असून भाजपाने नितीश कुमार यांना घरी बसवण्याचा निश्चिय केला आहे,असे खरगे म्हणाले.तर योगी स्वतःला मोदींचे (PM Narendra Modi)उत्तराधिकारी मानतात,अशा शब्दात त्यांनी योगींवर टीका केली.


जानेवारी २०२४ मध्ये भाजपाने नितीश कुमार (Nitish Kumar) यांना पुन्हा पाठिंबा देत बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन केले.त्यावेळी डबल इंजिनचा हवाला देत नितीश कुमार यांनी जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले होते.मात्र नितीश कुमार यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून कोणतेही विशेष पॅकेज बिहारला मिळाले नाही.बिहारची (Bihar)अर्थव्यवस्था पिछाडीवर गेली.डबल इंजिनचा दावा पोकळ ठरला,असे खरगे म्हणाले.


कार्यकारिणीची ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे असे सांगताना खरगे म्हणाले की, आपण अशा परिस्थितीत ही बैठक घेत आहोत की जेव्हा आपला देश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर अत्यंत खडतर प्रसंगातून जात आहे.एनडीएतील अंतर्गत कलह स्पष्ट दिसून येत आहे.नितीश कुमार हे आता भाजपाला (BJP) अवजड ओझे वाटू लागले आहेत.त्यांना घरी बसवायची भाजपाची पूर्ण मानसिकता तयार झाली आहे.


योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना खरगे म्हणाले की, योगी स्वतःला मोदींचा उत्तराधिकारी मानतात.केंद्रातील भाजपा आघाडीचे सरकार जातनिहाय जनगणना करण्याचा निर्धार करते.तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार जातीवर आधारित मोर्चांवर बंदी घालते.


हे देखील वाचा –

आयोगाच्या आधार लिंक सुविधेवर राहुल गांधींची टीकात्मक पोस्ट

मुंबईची पाणीचिंता मिटली;११ महिन्याचा पाणीसाठा

मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा

Web Title:
संबंधित बातम्या