आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार

  • युगेंद्र पवार यांची भूमिका
    मुंबई –
    उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार शरद पवारांसोबत निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराला उभा राहणार आहे. अजितदादाचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी पवार घराण्याची चौथी पिढी म्हणून राजकारणात पावले टाकायला सुरुवात केलेली आहे. युगेंद्र हे मुळात व्यावसायिक, पण त्यांच्या राजकारणात प्रवेश करण्याबाबत नवाकाळशी त्यांनी संवाद साधला.. अजित दादांबद्दल ते भावुक ही झाले पण तितक्याच तत्परतेने आपल्याला शरद पवार यांच्या बद्दल आदर असल्याचेही सांगितले.
    युगेंद्र पवार हे पवार घराण्याची चौथी पिढी म्हणून राजकारणात प्रवेश करत आहात, त्यामागे काय भावना आहे?
    युगेंद्र पवार – नाही. हा माझा राजकारण प्रवेश नाही. अजून राजकारणात पूर्णपणे सक्रिय व्हायचा निर्णय घेतलेला नाही, मी व्यावसायिक आहे.आधी मुंबईत होतो. नंतर पुण्यात होतो. काही वर्ष पुण्यात शिक्षण घेतले. त्यानंतर दोन-तीन वर्षे युरोपला गेलो. अमेरिकेला गेलो. सात-आठ वर्ष देशाबाहेर होतो. कोणाला वाटल नव्हते की, मी परत येईन. पण मी परत आलो. मुंबईत व्यवसाय केला. शरयू म्हणून एक ग्रुप आहे.तो माझ्या वडिलांनी सुरु केला आहे. शरयू टोयोटा हे नाव ऐकले असेल. त्यात सक्रिय आहे. चार वर्षापूर्वी शरद पवार साहेबांनी माझी विद्या प्रतिष्ठानवर निवड केली. त्यामुळे माझ्या घरात राजकारण आणि व्यवसाय हे दोन्ही आहे. सध्या व्यवसायात जम बसवतोय. पुढे मागे राजकारणात सक्रिय नक्की होईन. मला राजकारणात एक एक पायरी चढत वर जायला आवडेल. ग्राऊंड लेव्हलवर काम केल्याचा अनुभव वरती काम करताना फायदेशीर ठरू शकतो.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मधे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत.शरद पवार तुमचे आजोबा तर अजित पवार सख्खे काका. तुम्ही कोणाची निवड कराल?
युगेंद्र पवार – राजकारण आणि कुटुंब मी दोन्ही वेगळेच मानतो. वैचारिक भूमिका वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच राहिले पाहिजे. मी आजही अजित पवार यांना भेटतो, तेव्हा हा विषयच निघत नाही. शरद पवार यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. त्यांनीच माझी विद्या प्रतिष्ठानवर निवड केली आहे. शरद पवार म्हणतील ती आपली भूमिका असणार आहे.

लोकसभेला बारामती मधे काकी सुनेत्रा पवार आणि आत्या सुप्रिया सुळे समोरासमोर असतील, तर सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार का? लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजून १ महिन्याचा कालावधी आहे. या एका महिन्यात बऱ्याच घडामोडी घडतील. पण शरद पवारांनी सांगितले, तर सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यात मला आनंद होईल.

अजित पवार यांना एकटे पाडले गेले अशी भावना हल्लीच दादांनी बारामतीमध्ये व्यक्त केली? तुम्हाला तसे वाटते का ?
युगेंद्र पवार -असे मला वाटत नाही. कुटुंब फुटले असे मला वाटत नाही. शेवटी कुटुंब एकच आहे. कुटुंब आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे.
अजित पवार यांना एकटे पाडले गेले असे मला वाटत नाही. कुटुंबात मी छोटा माणूस आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top