इस्तांबुलमध्ये भीषण आग मजूरांसह २९ जणांचा मृत्यू

इस्तांबुल
तुर्कस्थानातील इस्तांबुलमध्ये मंगळवारी रात्री अंतर्गत सजावटीचे काम सुरु असलेल्या एका नाईटक्लब मध्ये लागलेल्या भीषण आगीत इथे काम करत असलेल्या मजूरांसह २९ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नाईट क्लबच्या व्यवस्थापकासह पाच जणांना अटक केली आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इस्तांबुलच्या एका १६ मजली इमारतीच्या बेसमेंट मध्ये असलेल्या मासक्वेरादे नाईट क्लबमध्ये ही दुर्घटना घडली. या क्लबमध्ये रिनोव्हेशन चे काम सुरु होते. मृत्यू झालेल्यांमध्ये इथे काम करत असलेले मजूर मोठ्या संख्येने असून यातील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. तज्ञांकडून या संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात येत असल्याचे येथील कायदेमंत्री यिलमाज तंक यांनी सांगितले आहे. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top