चेन्नई – उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या तामिळनाडूतील कुन्नूर येथील घराबाहेर बिबट्या आणि ब्लॅक पँथर फिरताना दिसले. हा अत्यंत दुर्मिळ असा योगाय़ोग आहे. गोएंका यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.गोएंका यांच्या घराबाहेर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरॅत हे दृष्य कैद झाले आहे.गोएंका यांनी या व्हिडिओसोबत ‘आमच्या घराबाहेर फिरणारे हे शानदार जीव आम्हाला जणू सांगत आहेत की आम्ही त्यांच्या घरात पाहुणे आहोत’,अशी पोस्ट लिहिली आहे.
