गुजरात राज्यात तीन वर्षांत ३९७ सिहांनी प्राण गमावले

नवी दिल्ली

गुजरात राज्यात २०१९ ते २०२१ मध्ये ३९७ सिंहाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिली. ते राज्यसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ३९७ सिंहांपैकी १८२ सिंहाचे छावे होते. त्यांचे वय ०-१ वर्षांदरम्यान होते. २०१९ मध्ये ६६ सिंह, ६० छावे, तर २०२० मध्ये ७३ सिंह आणि २०२१ मध्ये ७६ सिंह ,४६ छावे होते. मृत पावलेल्या १०.५३ टक्के सिंह व ३.८२ टक्के छाव्यांच्या मृत्यूचे कारण हे अनैसर्गिक होते. आशियाई सिंहाच्या संवर्ध- नासाठी वन्यजीव एकात्मिक विकास योजनेला केंद्राकडून मदत दिली जात आहे.

Share:

More Posts