प्रसिद्ध कॉमेडियन नील नंदाचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन

सॅक्रामेंटो- भारतीय वंशाचा प्रसिध्द आणि लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन नील नंदा याचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले. नीलच्या निधनाच्या वृत्ताला नीलचा मॅनेजर ग्रेग वाईजने दुजोरा दिला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. निधनाच्या एका दिवसाआधीच त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. नीलच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
नीलचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. नील लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. लहानपणापासूनच त्याला कॉमेडी करण्याची खूप आवड होती. नील जिमी किमेल लाइव्ह आणि कॉमेडी सेंट्रलच्या अॅडम डिव्हाईनच्या हाऊस पार्टीसाठी खूप लोकप्रिय होता. नीलच्या निधनाने त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नीलच्या चाहत्यांनी त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्याला श्रध्दांजली वाहिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top