नवी दिल्ली- सलग दुसर्यांदा देशाची सत्ता काबीज केलेल्या भाजपाने निवडणूक आयोगाला वार्षिक लेखापरीक्षण अहवाल पाठविला आहे.या अहवालात भाजपचे एकूण उत्पन्न २०२१-२२ पेक्षा २०२२-२३ मध्ये ५४ टक्क्यांनी वाढले आहे. २०२१-२२ मध्ये भाजपला १,९१७ कोटी निधी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाला होता. तर, २०२२-२३ मध्ये १३०० कोटी रुपयांचा निवडणूक निधी मिळाला आहे. त्यामुळे भाजपचा निधी २,१२० कोटी इतका झाला आहे. कॉंग्रेसला १७१ कोटी निवडणूक निधी मिळाला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.काँग्रेसपेक्षा भाजपला ७ पट अधिक निधी मिळाला आहे.
२०२३ मध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला १३०० कोटी रुपये मिळाले.२९२१-२२ च्या तुलनेत भाजपला ४४४ कोटी रुपये जास्त मिळाले. भाजपला ५४ टक्के हिस्सा म्हणजे १२७८ कोटी रुपये इलेक्टोरल बाँड्सद्वारे आले आहेत.भाजपच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार २०२२-२३ मध्ये व्याजातून २३७ कोटी रुपये कमावले आहेत.याशिवाय निवडणूक आणि प्रचारासाठी विमाने आणि हेलिकॉप्टरवर ७८.२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.पक्षाने उमेदवारांना आर्थिक मदत म्हणून ७६.५ कोटी रुपये दिले.तर, जाहिरातीसाठी भाजपने तब्बल ४३२ कोटी खर्च केला आहे.गेल्या वर्षी विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने १०९२ कोटी रुपये खर्च केले होते.
दरम्यान,तसेच २०२१-२२ मध्ये काँग्रेसला २०२२-२३ मध्ये १७१ कोटी रुपये निवडणूक रोख्यातून मिळाले,तर २०२१-२२ मध्ये २३६ कोटी रुपये निवडणूक रोख्यातून मिळाले. ‘सपा’ला निवडणूक रोख्यातून २०२१-२२ मध्ये ३.२ कोटी रुपये मिळाले होते.२०२२-२३ मध्ये त्यांना निवडणूक रोख्यातून काहीही उत्पन्न मिळाले नाही.तेलगू देसमला २०२२-२३ ला ३४ कोटी रुपये मिळाले.