भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या ११ गाड्या रद्द

भुसावळ- भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकांदरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. त्यामुळे भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ४ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
१६ ते २५ ऑक्टोबरदरम्यान हैदराबाद- जयपूर एक्स्प्रेस, १८ ते २७ ऑक्टोबरपर्यंत जयपूर- हैदराबाद एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबरला लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस, २७ ऑक्टोबरला राणी कमलापती- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १६ ते २६ ऑक्टोबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- हरिद्वार एक्स्प्रेस, १७ ते २७ ऑक्टोबरदरम्यान हरिद्वार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत भुसावळ- हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, १३ ते २२ ऑक्टोबरदरम्यान हजरत निजामुद्दीन- भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस १५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत अहमदाबाद- बरौनी एक्स्प्रेस, १५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत बरौनी- अहमदाबाद एक्स्प्रेस, २६ ऑक्टोबरला अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top